उद्यापासून एसटी कर्मचारी संघटनेने राज्यभर बेमुदत आंदोलन पुकारले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत मोठी बातमी समोर आली असून उद्यापासून (3 सप्टेंबर) एसटी कर्मचारी संघटनेने राज्यभर बेमुदत आंदोलन पुकारले आहे.आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने उद्यापासून म्हणजेच 3 सप्टेंबरला बेमुदत संप पुकारला आहे. ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने सामान्यांचे हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या एसटी कर्मचाऱ्यांच्या काय आहेत महत्त्वाच्या मागण्या?सोमवारी एसटी कर्मचारी संघटनांकडून तातडीने आर्थिक मुद्यांची सोडवणूक करावी यासाठी 2 सप्टेंबर 2024 रोजी राज्यभर निदर्शन करण्यात आले. मुंबई सेंट्रल येथे कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतून सरकारला शेवटचा इशारा देण्यात आला. सरकारने तातडीने मागण्या मान्य न केल्याने 3 सप्टेंबरपासून राज्यभर बंदची घोषणा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button