
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध भरतीसाठीची परीक्षा. इंटरनेटच्या अडचणीमुळे रद्द.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध भरतीसाठी आज जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी घरडा कॉलेज लवेल येथे आले होते मात्र इंटरनेटच्या अडचणीमुळे सदर परीक्षा रद्द करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले तसेच बँकेच्या वेबसाईटवर किंवा इतर माध्यमातून आपणाला गणपती नंतर पुढील परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले त्यानंतर एकच गोंधळ उडाल्याचे चित्र बघायला मिळत होते लांजा देवरुख रत्नागिरी मंडणगड दापोली खेड यासह अनेक ग्रामीण भागातून विद्यार्थी सकाळपासून ताटकळत उभे होते मात्र अचानक इंटरनेटचा अडचणीमुळे त्यांना परीक्षापरीक्षा देता आली नाही त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत होते