रत्नागिरी येथील श्रीमान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणातील सायन्स गॅलरी रत्नागिरी कराना व पर्यटकांना आकर्षण ठरणार.
रत्नागिरी येथील श्रीमान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स गॅलरीचे लोकार्पण शनिवारी करण्यात आले. या वेळी पालकमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर आणि ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे प्रमुख उपस्थित होते.निवांतपणे हे सर्व तारांगण व येथे ऑर्ट गॅलरी, सायन्स गॅलरी बघण्यासाठी यायला हवे. फारच छान. खूपच सुंदर बनविले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. मुलांना वैज्ञानिक जगताची ओळख व्हावी यासाठी अॅस्ट्रॉनॉमी गॅलरी येथे साकारण्यात आली आहे ज्यामध्ये तारांगणातील ग्रहांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. रॉकेटची प्रतिकृती,करण्यात आल्या आहेत. रॉकेटची प्रतिकृती, अंतराळवीर यांच्या सूटची प्रतिकृती येथे तयार करून ठेवण्यात आली आहे.