मुंबई वांद्रे येथून थेट मडगाव येथे सुरू करण्यात आलेल्या ट्रेनला खेड येथे थांबा नाही
मुंबई वांद्रे येथून थेट मडगाव येथे सुरू करण्यात आलेल्या ट्रेनला खेड येथे थांबा देण्यात आलेला नाही. मुंबईच्या उपनगरातून थेट कोकणात मडगाव पर्यंत सुरू झालेली ही पहिली रेल्वे आहे. त्यामुळेच रेल्वेला खेड येथे थांबा मिळेल अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र अपेक्षाभंग झाला आहे आता या नाराजीला शिवसेनेचे दापोली खेड मंडणगडचे आमदार योगेश कदम यांच्या पत्राने वाचा फोडली आहे. यासंदर्भात थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून आपली नाराजी स्पष्टपणे कळवली आहे.रत्नागिरी आणि चिपळूण असे दोनच थांबे रत्नागिरी जिल्ह्यात देण्यात आले आहेत. यावरूनच शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार योगेश कदम त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना थेट पत्र लिहून खंत व्यक्त केली आहे