
मराठा नेते मनोज जरांगे-पाटील हे आज मालवणमध्ये दाखल
मराठा नेते मनोज जरांगे-पाटील हे आज मालवणमध्ये दाखल झाले. सिंधुदुर्ग मराठा मंडळातर्फे सतीश सावंत, सुशांत नाईक यांनी मालवण येथे भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, त्या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे-पाटील यांनी पाहणी केली. यावेळी सतीश सावंत, सुशांत नाईक, संजय सावंत, संतोष सावंत, राजू रावराणे, पिंटू पटेल, पवन भोगले, मिलिंद अहिर आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.