डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातनुकतेच ३९ वर्षीय तरुणाच्या मेंदूच्या गाठीवरील एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वी.
डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातनुकतेच ३९ वर्षीय तरुणाच्या मेंदूच्या गाठीवरील एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.नुकतेच ३९ वर्षीय तरुण डोकेदुखी, चक्कर व डोळ्यांच्या दृष्टीमध्ये दोष याकरिता डेरवण रुग्णालयात दाखल झाला. यावेळी तपासणी अंती पिट्युटरी ग्रंथीशेजारी एक गाठ निदर्शनास आली. या गाठीमुळे या रुग्णाच्या मेंदूच्या मध्यभाग, मज्जतंतूंवर, डोळ्यांच्या नसेवर व पिच्युटरी ग्रंथीवर दाब आला होता.यामुळे मेंदूच्या मध्यभागी पिच्युटरी ग्रंथीच्या शेजारी असलेल्या या गाठीवर अत्यंत गुंतागुंतीची अशी शस्त्रक्रिया कोणतीही चिरफाड न करता केवळ दुर्बिणीद्वारे डॉ. मृदुल भटजीवाले यांनी यशस्वीरित्या केली. डॉ. मृदुल यांनी शस्त्रक्रियेत कोणत्याही प्रकारची बाह्य चिरफाड न करता किंवा टाक्याशिवाय पूर्णपणे नाकाद्वारे दुर्बीण घालून ती मेंदूपर्यंत पोचवली आणि त्याद्वारे अलगद गाठी काढली आणि रुग्ण बरा होऊन घरी गेला. यामुळे या रुग्णाला दिलासा मिळण्यास मदत झाली आहे