
कोट्यावधी रुपये कमावण्याच्या हव्यासापोटी निसर्गावर घाला घातला जात आहे-सिने अभिनेते मकरंद अनासपुरे
कोट्यावधी रुपये कमावण्याच्या हव्यासापोटी निसर्गावर घाला घातला जात आहे. त्यामुळे विविध झाडाझुडपांनी नटलेला निसर्ग प्राणी पक्षांसाठी की माणसाची हाव पुरविण्यासाठी? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विकासाच्या नावावरची मानवनिर्मित ही भयानक संकटे रोखण्यासाठी यापुढे निसर्गालाच हस्तक्षेप करावा लागेल. मात्र तोपर्यंत ती परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी चिपळूण येथे बोलताना व्यक्त केले. ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्था व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरालगतच्या धामणवणे येथे व्यावसायिक श्रीराम रेडीज यांच्या जागेत जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून मियावाकी फॉरेस्ट उभारले जाणार आहे. याच धर्तीवर त्या परिसरात २ हजार २०० झाडांची लागवड केली जाणार असून त्याचा शुभारंभ बुधवारी अभिनेते मकरंद अनासपुरे व आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. अनासपुरे बोलत होते.
www.konkantoday.com