क्रॉसिंग साठी थांबलेल्या राजधानी एक्स्प्रेस मधून प्रत्येकी दीड लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरीला, आता गुन्हा दाखल.
कोकण रेल्वे मार्गावरील खेड नजीकच्या अंजनी रेल्वे स्थानकात क्रॉसिंग साठी थांबलेल्या राजधानी एक्स्प्रेस मधून प्रत्येकी दीड लाख रुपये किमतीचे असे दोन १४ प्रो मॅक्स अँपल कंपनीचे ३ लाख रुपये किमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ८ जुलै रोजी घडली होती या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहेगुरुदत्त प्रभाकर शेनोई रा गुजरात यांनी तक्रार दाखल केली आहे ८ जुलै रोजी ते राजधानी एक्स्प्रेस ने प्रवास करत असताना मध्यरात्री ३.१५ वाजता गाडी क्रॉसिंग साठी थांबली असताना अज्ञात चोरट्याने बॅग मधील दोन मोबाईल फोन चोरून नेले