
शाळांमधील सीसीटीव्हीसाठी शासन ऍक्शन मोडवर.
बदलापूर प्रकरणानंतर मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे शासनाने आता सर्व शाळांना सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्हीवर होणारा खर्च जिल्हा नियोजनमधून करावा, असे आदेश देण्यात आला आहे. तसेच खाजगी शाळांमध्ये महिन्याच्या आत हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत तर कारवाई करण्याचा इशारा शासनाकडून देण्यात आला आहे.शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासन सध्या ऍक्शन मोडवर आले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी- विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २१ ऑगस्ट रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. शासन निर्णयान्वये जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. www.konkantoday.com