राजकोट येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःख देणारी-छत्रपती शाहू महाराज.
राजकोट येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःख देणारी आहे. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना कधीही घडली नाही, ती येथे घडली आहे. ही घटना का घडली? कोणामुळे घडली.कशामुळे घडली याचा विचार व्हावा. याला जे जबाबदार आहेत त्या सर्वांवर कारवाई व्हायलाच हवी. मी येथे येऊन पाहणी केल्यानंतर संपूर्ण बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे आहे हे दिसून आले. त्यामुळे याची सखोल चौकशी होऊन जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असे कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्ट केले.