
बोगस मजूर सहकारी संस्थांच्या तक्रारीचा ३० सप्टेंबरला अंतिम अहवाल सादर करा -जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे.
कोकणातील सहकार क्षेत्रात खळबळ घडविणारी बातमी आहे. सहकार क्षेत्रातील वाढत्या तक्रारींबाबत तसेच १५ ऑगस्ट रोजी झालेल्या उपोषणाबाबत कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार यांनी त्यांच्या दालनात जिल्हा निबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक झाली. तक्रारदार आणि जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या समोरासमोर झालेल्या चौकशीमध्ये खेडमधील सहकार क्षेत्रातील बोगस कारभार उघड झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी खेडमधील बोगस मजूर सहकारी संस्थांचा ३० सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करून त्या बंद कराव्यात, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी या वेळी दिले. या वेळी सहकार्य पतसंस्थांच्या त्रस्त शासकीय लेखापरीक्षणाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणीदेखील करण्यात आली. www.konkantoday.com