गांजा वाहतूक प्रकरणी आणखी धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता.
मुंबई-गोवा महामार्गावर भरणेनजिक स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चार लाख रुपये किंमतीच्या गांजा वाहतुकप्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळल्यानंतर मंडणगड कनेक्शन उघड झाले आहे. तिघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गांजा नेमका आणला कुठून? याचा येथील पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. गांजा वाहतूक प्रकरणी आणखी धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. www.konkantoday.com