
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी संदीप सावंत.
मराठा समाजासह बहुजन समाजाचे मजबूत संघटन असलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदावर चिपळूण मधील आक्रमक व धाडसी नेतृत्व असलेले संदीप सावंत यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी नियुक्ती पत्र देत त्यांच्या नावाची घोषणा केली. श्री. सावंत यांच्या रूपाने मराठा महासंघाला एक उमदे लढावू नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले आहे.१२४ वर्षांची परंपरा असलेली अखिल भारतीय मराठा महासंघ ही सर्वात जुनी व मजबूत अशी संघटना आहे. देशभर या संघटनेचा विस्तार असून हजारो सदस्य या संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी काम करत आहेत.www.konkantoday.com