संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथे शाळकरी मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांनी जाब विचारत पोलिसांच्या ताब्यात दिले.
बदलापूर प्रकरणानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील एका शिक्षकांनी छोट्या बालिकांची अश्लील चाळे करण्याचा प्रकार उघड झाला आहे संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथे शाळकरी मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांनी जाब विचारत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी उघडकीस आली.याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार वांद्री येथील प्राथमिक शाळेत पाचवी,सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत शाळेतील शिक्षक अश्लील चाळे करत होता. पाचवी, सहावीतील मुलींशी तो अश्लील कृत्य करत होता. या मुलींनी सारा प्रकार घरी सांगितला.संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी तातडीची पालक सभा लावली आणि संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षकाला जाब विचारण्यास सुरूवात केली. हि बातमी वाऱ्यासारखी पसरताच अन्य ग्रामस्थांनी सायंकाळी शाळेवर धडक दिली. शिक्षकाला जाब विचारला. वातावरण चिघळताच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. प्रकरण गंभीर असल्याने डिवायएसपीसह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करत शिक्षकाला ताब्यात घेतले. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळते