
नेत्रावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्यांना संगमेश्वर स्टेशनला थांबा मिळावा अन्यथा भूमिपुत्रांचा आंदोलनाचा इशारा
नेत्रावती एक्सप्रेस मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी संगमेश्वर स्टेशनला थांबा मिळावा यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुपतर्फे मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप रेल्वे प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करीत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.
प्रवाशांनी केलेल्या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर 10 डिसेंबर रोजी कोकण रेल्वेने उत्तरादाखल जे पत्र दिले ते भूमिपुत्र प्रवाशांना न पटण्यासारखे आहे. संगमेश्वर येथे थांबा का मिळत नाही याचे सुयोग्य कारण द्यावे यासाठी दोन्ही ग्रुपच्या वतीने पुन्हा एकदा पत्रव्यवहार करण्यात आला पण अद्याप प्रशासनाकडून कोणतीही हालचाल दिसत नसल्याचे सभासदांचे म्हणणे आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व निर्णय शिथिल होत असताना रेल्वे प्रशासनाने स्थानिक रहिवाशी आणि मुंबईहून प्रवास करणाऱ्या सर्व चाकरमानी यांच्या मागणीचा लवकरात लवकर विचार करावा अन्यथा आंदोलन किंवा लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन आणि सभासदांनी दिला आहे.
www.konkantoday.com