रत्नागिरी पावस मार्गावर रस्त्यावर बसलेल्या गुरांमुळे अपघाताचा धोका.
रत्नागिरी ते पावस हा सागरी मार्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे; मात्र गेले काही दिवस या मार्गावर मोकाट जनावरांचा राबता वाढला असल्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा परिसर दिवसेंदिवस अपघातक्षेत्र बनत असल्यामुळे मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करा, अशी मागणी चालकांमधून होत आहे.पावस परिसरात फणसोप, कसोप, कुर्ली, मागलाड, कोळंबे, गोळप आदी भागांतील अनेक शेतकऱ्यांकडे पशुधन आहे; परंतु शेतीची कामे आटोपल्यावर पाळीव जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडली जातात.परिणामी, काळोखात या मार्गावर अनेक अपघात घडतात. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी संबंधित मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.