रत्नागिरी एसटी स्टँड समोरील कॉम्प्लेक्स जवळील अनेक प्रवाशांना सावली देणारे झाड अचानक भुईसपाट.
रत्नागिरीतील एसटी स्टँड चे काम सुरू झाल्यानंतर एसटी स्टँड समोर कॉम्प्लेक्स समोर असलेले झाड बस साठी उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांना सावली देत होते मात्र आता हे झाड अचानक पूर्णपणे तोडून टाकण्यात आले आहे मुळात या भागातील असलेले हे झाड अनेकांना सावलीचा आधार ठरत होते त्यामुळे गेली दोन अडीच वर्षे या झाडाखाली अनेक प्रवासी थांबत असत मात्र त्यानंतर या ठिकाणी बसची छोटीशी शेड घालण्यात आली तरीदेखील या झाडाखाली अनेक प्रवासी थांबत असत मात्र हे झाड कॉम्प्लेक्स समोर अडथळ्याचे ठरत असल्याने काही दिवसापूर्वी या झाडाच्या फांद्या छाटण्यात आल्या होत्या त्यामुळे या झाडाचे भवितव्य त्याचवेळी निश्चित झाले होते त्यानंतर हे झाड हळूहळू सुकू लागले आता इतके वर्ष हिरवेगार असलेले झाड अचानक कसे सुकू लागले असा प्रश्न पडला असतानाच आता तर हे झाड मुळापासून तोडून त्याच्या फांद्या तेथेच रचून ठेवण्यात आले आहेत मुळात नगर परिषदेच्या हद्दीतील झाड तोडताना परवानगी घ्यावी लागते कारण रस्त्यावरच्या झाडाची मालकी नगर परिषदेचे असते असे असताना हे झाड नेमके मुळापासून तोडले आणि हे करीत असताना नगरपरिषदेचे अधिकारी डोळे झाकून बसले होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या प्रकारात नगर परिषदेचे अधिकारी सामील आहेत का असा प्रश्न आता असा प्रश्न उपस्थित झाला आहे झाड तुटल्यामुळे आता प्रवासी छत्र्या घेऊन सावलीचा आधार घेत आहेत