उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन दुर्घटना घटनास्थळाची पाहणी केली
आज ( शुक्रवार) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन दुर्घटना घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सुनील तटकरे देखील उपस्थित होते. राजकोट किल्ल्यावर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर येऊन भेट देखील देऊन गेले आहेत. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या किल्ल्यावर येऊन दुर्घटना स्थळाची पाहणी केली. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्यासोबत यावेळी होती.ज्याठिकाणी पुतळा कोसळण्याची ही दुर्दैवी घटना घडली, त्यांनी तेथील पाहणी केली. राजकोट किल्ल्याच्या बुरूजापासून ते जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा, स्ट्रउभा होता त्या ठिकाणच्या पाहणीसाठी ते दोखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत खा. सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते.