अर्धवट विकासकामे मार्गी लावा, अन्यथा रस्त्यावर उतरू- लांजा शहर समन्वय समिती.
वारंवार समज देवूनही त्याकडे नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून शहरातील अर्धवट विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल, असा सक्त इशारा लांजा शहर समन्वय समितीने लांजा नगर पंचायत प्रशासन तथा मुख्याधिकारी हर्षला राणे यांना दिला.लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निवेदन देवूनही अर्धवट, दिरंगाईने आणि दुर्लक्षित होत असलेल्या विकासकामांबाबत लांजा नगर पंचायतीकडून हालचाली न केल्याने गुरूवारी लांजा समन्वय समितीने लांजा नगर पंचायतीवर धडक दिली. यावेळी समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी आक्रमक होत मुख्याधिकारी यांना अर्धवट कामाचा पाढाच वाचून दाखवला. प्रलंबित व दुर्लक्षित विकासकामांबाबत लांजा समन्वय समितीच्यावतीने जून महिन्यात निवदन देण्यात आले होते. मात्र २ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी शहरातील विकासकामे मार्गी लावण्यात आली नाहीत. www.konkantoday.com