शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून राजकारण करून कोणी पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये-रामदास कदम
शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून राजकारण करून कोणी पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका रामदास कदम यांनी केलीय. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय.राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज पुण्यासह राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं राजकारण व्हायला नको, ही जाणूनबुजून झालेली घटना नाही. याची चौकशी होईल, जे दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई होईल असंही कदम यावेळी म्हणालेत. कदम यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रामदास कदम यांनी आज तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं, यावेळी ते बोलत होते