लाडक्या बहिणींना दर महिना 1500 रुपयांसोबतच तीन गॅस सिलिंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करणारी योजना
अजित पवारांची यात्रा बीड जिल्ह्यात आहे. गेल्या 8-9 दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दुसऱ्यांदा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.घरगुती वापराचे गॅस सिलिंडर दिवसेंदिवस महाग होत चालेले आहेत. त्यात गृहिणींना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषीत केली होती. या योजनेंतर्गत 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे. या घोषणेचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. लाडक्या बहिणींना दर महिना 1500 रुपयांसोबतच तीन गॅस सिलिंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करणारी ही योजना आहे, असे अजित पवार म्हणाले.