
भाट्ये येथील कोहिनूर हॉटेल रस्त्यावर उतारात दोन मोटारीत अपघात.
भाट्ये येथील कोहिनूर हॉटेल समोरील रस्त्यावर उतारात दोन मोटारीत अपघात झाला. संशयित मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत बाळकृष्ण जाधव (रा. साटवली रोड, लांजा) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) सकाळी साडेअकराच्या सुमारास पावस ते रत्नागिरीकडे येणाऱ्या रस्त्यावर कोहीनूर हॉटेल उतारात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धी सुनिल कोकरे या त्यांच्या ताब्यातील मोटार (क्र. एमएच-४६बीझेड ७०२९) ही घेऊन गोळप ते रत्नागिरी अशा येत होत्या. कोहिनूर हॉटेल उतारात आल्या असताना मागून येणारी मोटार (क्र. एमएच-०२ सीएल ७८५३) वरील संशयित चालक अनंत जाधव यांनी मोटार निष्काळजीपणे चालवून पुढे जाणाऱ्या मोटारीला धडक दिली. या मध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.