मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीनंतर एकत्रितपणे ठरवू-काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला
महाविकास आघाडी एकत्र म्हणून निवडणूक लढणार आहे. जागावाटपबाबत दोनदा चर्चा झालेल्या आहेत. लवकरच पुन्हा एक बैठक होईल. मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीनंतर एकत्रितपणे ठरवू. आम्ही कोणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.गुरुवारी नागपुरात आले असला चेन्नीथला पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमच्यात कुठलेही मतभेद नाही. सर्वांना घेऊन चालू, आघाडी धर्म पाळू. महाराष्ट्र ही काँग्रेसचे भूमी आहे. त्यामुळे जास्त जागा लढण्यासाठी मागू, असा युक्तिवादही त्यांनी केला.