मुंबई विद्यापीठातर्फे कोकण विभाग क्र. ४ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन गोगटे जोगळेकर कॉलेज अव्वल
मुंबई विद्यापीठातर्फे कोकण विभाग क्र. ४ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन येथील स. ह. केळकर महाविद्यालयात करण्यात आले. या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला गटात रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदविला.यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण विकास मंडळाचे पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य विजयकुमार कुनुरे, कोकण क्रीडा समितीचे सचिव शशांक उपशेट्ये, आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेच्या उपसचिव निधी भडवलकर यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा, सांघिक विभाग (पुरुष)-गोगटे जोगळेकर महाविद्यालय (रत्नागिरी), जे. एस.एम. महाविद्यालय (अलिबाग), दापोली अर्बन बँक महाविद्यालय (दापोली), सांघिक विभाग (महिला)-गोगटे जोगळेकर महाविद्यालय (रत्नागिरी), दापोली अर्बन बँक (दापोली), जे. एस. एम. महाविद्यालय (अलिबाग), वैयक्तिक पारितोषिके (पुरुष)- यश गोगटे (रत्नागिरी), मयुरेश परुळेकर (कुडाळ), नरेंद्र कुठे (अलिबाग), वैयक्तिक पारितोषिके (महिला)-अनुश्री गुरव (अलिबाग), हर्षदा प्रभू (कणकवली), अस्मिता खानविलकर (रत्नागिरी). स्पर्धेसाठी पंच म्हणून भारत चौगुले, मनीष मारुलकर, श्रीकृष्ण आडेलकर, सुयश धामापूरकर, सुशील निब्रे यांनी काम पाहिले.