
माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोशल मीडियावरुन पुन्हा डिवचलं
राजकोट किल्ल्यावर बुधवारी झालेल्या राड्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोशल मीडियावरुन पुन्हा डिवचलं आहे.रात्री पावणे दोनच्या सुमारास निलेश राणेंनी आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) हॅण्डलवर पोस्ट करत ठाकरेंना आव्हान दिलं आहे. सध्या निलेश राणेंची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.किल्ल्यावरील या वादानंतर निलेश राणेंनी सोशल मीडियावरुन पुन्हा ठाकरेंना आव्हान दिलं आहे. “ठाकरे यांची खरी लायकी महाराष्ट्राला कळली. ठाकरे (स्वत:) आमदार, (त्यांच्यासोबत) एक विरोधी पक्ष नेता आणि एक माजी खासदार (सोबत) असून सुद्धा हतबल झाले,” असं निलेश राणे म्हणाले आहेत. “अडीच तास लपून बसावं लागलं. उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या) कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांसमोर मार खाल्ला. मैदान सोडून एका बाजूने सटकावं लागलं,” असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी, “हा ट्रेलर होता अर्धा तास अजून थांबला असता तर पूरा पिक्चर दाखवला असता,” असा इशारा दिला आहे. तर पोस्टच्या शेवटी, “आदित्यसारखा घाबरट मी बघितला नाही,” असं म्हणत थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.