महामार्गावर तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारणार
यंदा ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. कोकण मार्गावर २ ते १७ सप्टेंबर या कालावधीत ४३०० बसेच चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक बसफेर्यांचे आरक्षणही झाले आहे. महामार्गावर ठिकठिकाणी बसेस दुरूस्तीसाठी पथके तैनात करण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहेही उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली . www.konkantoday.com