
पोमेंडीतील कृषी विभागाच्या कार्यालयात चोरी
रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी येथे कृषी विभागाचे कार्यालय चोरट्यांनी फोडून संगणक चोरून नेला. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी सारिका भिमराव पाटील यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ ऑगस्ट २०२४ रोजी पोमेंडी येथील कृषी विभाग कार्यालयाच्या खिडकीचे ग्रील उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कार्यालयातील संगणक चोरून नेला, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. सध्या कोसळणार्या जोरदार पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला. www.konkantoday.com