
नारायण राणे यांच्यावरती सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा- सुषमा अंधारे
पत्रकारांना अरेरावीची भाषा, महिला पत्रकारांशी असभ्येतेने वागणं आणि पोलिसांवर दमदाटी करणं नारायण राणे यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक अशांतता केल्याप्रकरणी नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलीआज पुण्यात नारायण राणेंच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नारायण राणे आणि निलेश राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही दिली.यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, पत्रकारांना दमदाटी करणं, महिला पत्रकारांशी असभ्यतेने वागणं, पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं, पोलिसांना दमदाटी करणं, पोलिसांच्या अंततीला येण्याचा प्रयत्न करणं. हे सगळं लॉयन ऑर्डर विस्कळित करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्यामुळे सुरू आहे. नारायण राणे आणि त्यांचे चार आणे, बार आणे या कळसुत्री बाहुल्या आहेत. मुख्य सुत्रधार जे आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे की महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे. महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे.नारायण राणे यांना तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का ? याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे. इकडे यायचं नाही असं काल नारायण राणे काल बोलले. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा सातबारा हा नारायण राणेंच्या बापाचा नाही आहे. हा सातबारा महाराष्ट्राच्या बापाचा आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यावरती सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. राणेंवर गुन्हा दाखल करून घेण्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे. असेही त्या म्हणाल्या.