
दुग्धजन्य पदार्थावरून ए-१, ए-२ नोंदी हटविण्यासाठी ६ महिन्यांची मुदत
केंद्र सरकारने अन्न पदार्थांशी संबंधित व्यावसायिकांकरिता दिशा निर्देश जारी केले आहेत. जे अन्न उद्योजक दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की, तूप, लोणी, दही इत्यादी ए-१ आणि ए-२ नावाने विकत आहेत. त्यांना हे निर्देश लागू होणार आहेत.केंद्र सरकारच्या एफएसएसएआय या संस्थेचा परवाना घेवून अनेक उद्योजक ए-१, ए-२ अशा नोेंदीखाली पदार्थ विकत आहेत. अन्न सुरक्षा कायदा २००६ ची मानके मात्र यातून पूर्ण होत नसल्याने या दोन्ही प्रकारच्या नोंदी अन्न पदार्थांवरून हटवण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले.www.konkantoday.com