चिपळूण नगर परिषदेची दुसरी इमारतही धोकादायक,अधिकारी, कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण
चिपळूण येथील नगर परिषदेची दुसरी इमारतही धोकादायक बनू लागली आहे. सध्या या इमारतीमध्ये प्रशासनाचा कारभार सुरू असताना तिचीही पडझड सुरू झाली आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण असून मुख्याधिकार्यांनी आपली केबिनही बदलली आहे.येथील नगर परिषदेची स्थापना १ डिसेंबर १८७६ साली झाल्यानंतर १९४७-४८ साली पहिली इमारत, तर १९७४ साली दुसरी इमारत बांधण्यात आली. पहिली इमारत दगडी बांधकामाची असून तिला ७७ वर्षे तर दुसर्या इमारतीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र ही इमारत आता अखेरची घटका मोजत आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनुसार ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्याने मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी येथे असणार्या विभागांचा कारभार लगतच्या इमारतीत हलवून ही इमारत मोकळी केली आहे. सध्या तिचा बराचसा भाग कोसळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही भाग पडण्याच्या स्थितीत आहे. ही इमारत धोकादायक असल्याने तेथे सूचना फलक लावण्यात आला आहे.www.konkantoday.com