
चिपळुणातील महापुरूषांच्या पुतळ्यांना नगर परिषदेच्या सुरक्षारक्षकांचा २४ तास पहारा
चिपळूण शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज याचा अश्वारूढ पुतळा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नगर परिषदेच्या सुरक्षारक्षकांचा पहारा ठेवण्यात आला आहे. तसेच पोलिसांचीही नजर राहत असून सुरक्षिततेच्या कारणास्तव ही खबरदारी घेतली जात आहे.काही वर्षापूर्वी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नगर परिषदेने उभारला आहे. येथे विविध कार्यक्रम नगर परिषद व काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून साजरे केले जातात. मात्र सुरक्षिततेची जबाबदारी नगर परिषद व पोलिसांनी घेतली आहे. त्यानुसार येथे दिवस-रात्र नगर परिषदेचे कर्मचारी तैनात असतात. तसेच पोलीस किंवा होमगार्ड यांचाही पहारा असतो. विशेष म्हणजे येथे येणार्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर या यंत्रणांचे पूर्णपणे लक्ष असते. अनोळखी तसेच संशयित वाटल्यास त्याची चौकशीही केली जाते. त्यामुळे येथील सुरक्षा सुरळीत असल्याचे दिसून येत आहे.www.konkantoday.com