गणेशभक्तांचा प्रवास खड्ड्यातूनच होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गावरील खड्डे भरण्याच्या सूचना दिल्यामुळे येत्या आठ दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार त्याची कशी कार्यवाही करतात यावर भवितव्य अवलंबून राहणार आहे. सध्या महामार्गाची स्थिती दयनीय आहे….! महामार्गावर अद्यापही रूंदीकरणाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी वाहतूक वळवण्यात आलेली दिसून येत आहे. महामार्गानजीक जगबुडी पुलावर गटार नादुरुस्त असल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसून येत आहे.