केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या द्वि-साप्ताहिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आजपासून सुरु झालेल्या वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या द्वि-साप्ताहिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.पश्चिम रेल्वेने यासंदर्भातील व्हिडीओ आणि फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली. “आनंदाचा क्षण…! कोकणासाठी नवीन रेल्वे सेवा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी वांद्रे टर्मिनस ते मडगांव दरम्यानच्या नवीन ट्रेनच्या उद्घाटन सेवेला बोरिवली येथे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवला,” या ट्विटसह पश्चिम रेल्वेने ही माहिती दिली.