
आसगे दाभोळे रस्त्यावरून चिर्याची वहातूक करणारा ट्रक आमदार राजन साळवी यांनी रोखून ,मार्ग बदलायला लावला
आसगे दाभोळे रस्त्यावरून चिर्याची वहातूक बंद करावी अशी मागणी असताना देखील या रस्त्यावरून चिरा वाहतूक सुरू आहे काही दिवसापूर्वी या मार्गावर चिऱ्याच्या टपला अपघात होऊन दोन जण ठार झाले होते आज अशाच प्रकारे चिऱ्याच्या ट्रकची वाहतूक सुरू असताना राजापूर -लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी लांजा आसगे दाभोळे रस्त्यावरून चिर्याची वहातूक करणारा अवजड ट्रक थांबवून पालीमार्गे जाण्यास सांगितले. आज आमदार साळवी दुपारी दोन वाजता रस्त्याची झालेली दुरावस्था याची पाहणी करीत असतानाच हा ट्रक तेथून जाताना आढळला त्यांनी हा ट्रक रोखुन धरला. आमदार राजन साळवी यांनी तालुक्यातील विविध विकास कामे दुरावस्था झालेले रस्ते याची पहाणी केली .आसगाव दाभोळे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्याची पहाणी करत होते या रस्त्यावरून अवघड वाहनातून मोठ्या प्रमाणात चिर्याची वहातूक केली जात असल्याने रस्त्याची खुपच दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून चिर्याची वहातूक बंद करण्याची मागणी सातत्याने संबंधीत यंत्रणेने कडे करण्यात आली. मात्र अद्यापही या रस्त्यावरून अवजड वहाने मधुन चिर्याची वहातूक बंद झालेली नाही. वाहतुकीसाठी होणारी गैरसोय पहाता आमदार राजन साळवी अवजड ट्रक ला थांबवुन वळवून पाली मार्गे नेण्यास भाग पाडले