
एप्रिल, मे २०२० मध्ये होणाऱ्या MPSC च्या परीक्षा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पुढे ढकलेल्या परीक्षा सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणार
एप्रिल, मे २०२० मध्ये होणाऱ्या MPSC च्या परीक्षा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या परीक्षा सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. राज्य सेवा पूर्वपरीक्षा २०२० आता १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० आता ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० आता १ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
www.konkantoday.com