
युवकांना योग्य दिशा, योग्य शिक्षण व योग्य प्रयत्न आणि मेहनत केली तर यशस्वी व्हाल- केंद्रीय मंत्री नारायण राणे
रत्नागिरी : युवकांना योग्य दिशा, योग्य शिक्षण व योग्य प्रयत्न आणि मेहनत केली तर यशस्वी व्हाल. कोकणातील तरुण-तरुणींनी यात लक्ष घालून काहीतरी चांगले निर्माण करा. आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करायला तयार आहोत. रत्नागिरी हे देशातील प्रगत, देखणं आणि एक आदर्श शहर बनवूया. दर्जेदार शिक्षण तसेच रोजगारासाठी मंत्री उदय सामंत यांना सोबत घेऊन आराखडा तयार करणार आहोत. युवकांमध्ये क्रांती करण्याची ताकद आहे, त्याकरिता चांगले शिक्षण आवश्यक आहे. तर देश महासत्ता बनणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.महायुतीतर्फे जयेश मंगल पार्क येथे सोमवारी झालेल्या मेळाव्यात ते युवक-युवतींशी संवाद साधत होते. व्यासपीठावर मंत्री उदय सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, शिवसेना शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, स्मितल पावसकर, कांचन नागवेकर, शिवानी सावंत, भाजपा शहराध्यक्ष राजन फाळके, भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, संयोजक संजय यादव, विक्रम जैन, केतन शेट्ये, तुषार साळवी, प्रतिक देसाई, संकेत कदम, सिद्धाय मयेकर, देवदत्त पेंडसे, अनिरुद्ध फळणीकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.राजेश सावंत म्हणाले की, आम्हाला उद्योग, प्रकल्प हवे आहेत. त्यामुळे त्याला विरोध करणारे खासदार आम्हाला नकोत. प्रकल्प आले तर रोजगार मिळेल. कोकणचा निसर्ग सांभाळून प्रकल्प आणण्यासाठी मंत्री राणे प्रयत्न करत आहेत. परंतु उबाठाचे खासदार प्रकल्पांना विरोध करून युवकांच्या पोटावर पाय मारत आहेत. त्यांना मतदान करू नका. युवकांनी सर्वांना सांगावे. प्रत्येक गोष्टीला विरोध करत आहेत. सर्व प्रश्न मत्स्य, आंबा फळप्रक्रिया धोरण निश्चित केले आहे. सिंधुदुर्गमध्ये कारखाने येत आहेत. रत्नागिरीतही हे कारखाने आले पाहिजेत. त्याकरिता राणे साहेबांना निवडून देऊया.मंत्री उदय सामंत म्हणाले की, युवक, युवकांनी प्रत्येकी १०० जणांना मतदानासाठी आणावे व कमळाच्या निशाणीचे बटण दाबावे. आपण महायुतीचे आहोत व पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा निवडून आणायचे आहे, राणेंना विजयी करायचे आहे, ही गोष्ट मनावर घ्या. त्यासाठी मिशन राबवा. युवकांच्या मतावर सर्व काही अवलंबून आहे. युवकांना तिकीट मिळत नाही, असं समजण्याचे कारण नाही. लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद असेल युवकही पुढे येतात. महायुतीच्या युवक-युवतींनी आक्रमक व्हावे. म्हणजे मारामारी करायची नव्हे तर आपले प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडून ते सोडवण्यासाठी, रोजगारासाठी, चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. डॉ. ऋषिकेश केळकर म्हणाले की, मोदी सरकारने महिला, युवा, शेतकरी व गरीब यांच्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. जातीधर्माच्या राजकारणात न पडता ते मोदी काम करत आहेत. तिसऱ्या वेळी विकासरथात कोकणाला पुढे घेऊन जाणारा खासदार म्हणून नारायणराव राणे यांना निवडून दिले पाहिजे. यानंतर अनिरुद्ध फळणीकर, बिपीन बंदरकर, संजय यादव, सुजाता साळवी, कांचन नागवेकर यांनी मनोगत व्यक्त केले.या वेळी नारायण राणे म्हणाले की, देशाची लोकसंख्या १४५ कोटी आहे. यात तरुणांची संख्या ४० टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या देशात प्रगतीची क्रांती व्हायलाच पाहिजे. त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहे. २०२४ पर्यंत भारत विकसित राष्ट्र होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलोर किंवा परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज नाही. त्याकरिता येथे चांगले शिक्षण, रोजगार देऊ.राणे म्हणाले की, आज काही पत्रकार मुलाखत घ्यायला आले होते. त्यांनी विचारले, संविधान बदलणार आहोत का या प्रश्नावर राणे यांनी सांगितले आम्ही संविधान बदलणार नाही. दुसरा प्रश्न उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल का? मी म्हटले कशासाठी तो आंधळा, पांगळा, लंगडा आहे का? माननीय शिवसेना प्रमुखाने बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या रक्षणासाठी शिवसेना स्थापन केली. शिवसेना देशाच्या देशात वाढवली. कुठल्या पदासाठी, पैशासाठी हिंदुत्वाचा त्याग केला नाही. बाळासाहेबांच्या नंतर उद्धवने काय केलं. हिंदुत्वाला बगल दिली, मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर युती केली. अडीच वर्षात मंत्रालयात फक्त दोन वेळा गेला. कोरोनाच्या काळात पोटापाण्याचा प्रश्न सोडवला नाही.उद्धव ठाकरे, खासदारावर टीकाजैतापूर अणुउर्जा प्रकल्प रोखण्यासाठी कोळसा उत्पादकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चेनंतर लोकसभेत यांच्या खासदारांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा मी वृत्तपत्रात बैठकीची बातमी वाचून दाखवली, असे राणे म्हणाले. राणे यांनी खासदार विनायक राऊंतावर नाव न घेता टीका केली. उद्धव ठाकरेंना ३८ कोळसा कंपनींचे मालक भेटले. जैतापूर प्रकल्प सुरू झाल्यास कोळसा उत्पादक अडचणीत येतील, असे या मालकांनी सांगितले. अखेर तडजोड झाली आणि प्रकल्पाला विरोध केला. प्रदूषणाचे कारण देत यांना नाणार नको. मग स्वतः तरी एखादा कारखाना आणायचा. चिपी विमानतळ करताना देखील १५ माणसे घेऊन विद्यमान खासदारांनी विरोध केला. आणि तेच खासदार विमानतळाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताला होते. हा खासदार तोड बहाद्दर आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. सी वर्ल्ड प्रकल्पाला देखील यांनी विरोध केला. रेडी पोर्ट मंजूर केला, दर महिन्याला खासदारांचा मुलगा तोडपाणी करायला जातो. रत्नागिरीचा महामार्ग याच खासदाराने थांबवला. ठेकेदाराकडे २० कोटी मागितले म्हणून काम थांबले. पण सिंधुदुर्गमध्ये चार वर्षांपूर्वीच महामार्गाचे काम पूर्ण झाल्याचे राणे म्हणाले. ज्या माणसाने विकासाची कामे थांबवून आमच्या तरुण तरुणींना विकासापासून वंचित ठेवले त्यांना मत न देता मोदी सरकारसाठी मला मत द्यावे, असे राणेंनी आवाहन केले.www.konkantoday.com