अल्पवयीन युवतीकडे शरीरसुखाची मागणी करणार्यास अटक
अल्पवयीन मुलीचे फोटो मार्फ करून धमकी देत शरीरसुखाची मागणी करणार्या जगदीश मारूती गोटल (२८, रा. गुणदे गोटलवाडी) याला येथील पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जानेवारी ते १३ ऑगस्ट या कालावधीत ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.पीडित अल्पवयीन युवतीचा बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून तिचे मार्फ केलेले अश्लील फोटो अपलोड करत तिच्या व्हॉटसऍप क्रमांकावर अनोळखी व्हॉटसऍप क्रमांकावरून पाठवले. यानंतर धमकीसह अश्लील मेसेज पाठवत शरीरसुखाची मागणी केल्याचे पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करत सीमकार्ड धारकाचा शोध घेतला असता त्याने अन्य व्यक्तीस वापरण्यास दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेत चौकशी केली असता ३१ जुलै रोजी लोटे एमआयडीसीतील आरएसडी कंपनीमध्ये कामाला असताना सिक्युरिटीकडे मोबाईल दिला होता. याचवेळी सिक्युरिटीच्या ताब्यातून कोणीतरी मोबाईल नेला होता. या दरम्यान कंपनीतील इन-आऊट रजिस्टर पडताळणी केली असता जगदीश गोटल नावाचा व्यक्ती काम संपवून घरी गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याचा शोध घेत पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असताना हालचाली संशयास्पद वाटल्याने ताब्यात घेतले. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर अटक करण्यात आली. त्याच्याकडून १० हजार रुपये किंमतीचे २ मोबाईलही जप्त करण्यात आले. www.konkantoday.com