
मालवणमध्ये आज मविआचं आंदोलन
शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जाणार आहे. मालवणमध्ये आज महाविकास आघाडी निषेध आंदोलन करणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या मोर्चात सहभागी होणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, शरदचंद्रजी पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील माझी खासदार विनायक राऊत आज राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत. कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत. पाहणी केल्यानंतर या घटनेचा निषेध गोंधळासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. मालवणातील भरड नाका ते मालवण पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढला जाणार आहे.




