
तीन कोटी एकोणतीस लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्याखेड प्रशासकीय इमारतीला अवघ्या तीन वर्षात गळती
तीन कोटी एकोणतीस लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या येथील प्रशासकीय इमारतीला अवघ्या तीन वर्षातच लागलेल्या गळतीने दर्जाहीन कामाचा नमुना समोर आला आहे. पावसाचे पाणी तळमजला परिसरात झिरपत असल्याने दैनंदिन कामकाजासाठी तहसीलदार कार्यालयात येणार्या नागरिकांसह अधिकारी व कर्मचार्यांना त्रास सहन करावा लागत आहे. आधीच या इमारत उभारणीच्या कामास तब्बल ६ वर्षे मोजावी लागली. तरी देखील झालेल्या दर्जाहीन कामामुळे सार्यांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी ३ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम, तत्कालीन पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या साक्षीने मे २०१५ मध्ये नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामाच्या भूमिपूजनाचा नारळ फुटला होता. www.konkantoday.com