खेड शहराजवळच्या भरणे नाका येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४ लाखाहून अधिक किंमतीचा गांजा हस्तगत

खेड शहराजवळच्या भरणे नाका येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४ लाखाहून अधिक किंमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.रत्नागिरी : जिल्ह्यात खेड येथे तब्बल 22 किलो गांजा ताब्यात घेऊन तिघांना अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड शहरात भरणे नाका येथे खेड चिपळूण मार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाला संशयास्पद कार व कारमध्ये तीन जण आढळले. अधिक झाडाझडती घेतल्यावर त्यांचेकडून एकूण ४ लाख ४१ हजार १८० रुपये किंमतीचा २२.०५९ कि. ग्रॅम वजनाचा गांजा, दोन बॅग तसेच ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी असा एकूण १० लाख ४१ हजार ३८० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button