अखेर पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोरील खड्डे बुजले

रत्नागिरी शहरातील रस्त्यांचे खड्डे आता बऱ्यापैकी बुजवत आणण्यात आले आहेत जयस्तंभ कडून कोर्टाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयाच्या समोरच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते त्यामुळे या ठिकाणाहून वाहने चालविताना मोठा त्रास होत होता मध्यंतरी रत्नागिरी नगर परिषदेने डांबर टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याला यश आले नव्हते मात्र काल या ठिकाणी जवळजवळ 30 ते 40 फुटाच्या रस्त्यावर पूर्णपणे सिमेंट काँक्रीट टाकून हे खड्डे बुजवण्यात आले आहेत त्यामुळे आता नागरिकांचे या खड्ड्यांपासून मुक्तता होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button