
सकाळपासून दहीहंडी फोडताना विविध भागातदहीहंडी फोडताना 41 गोविंदा जखमी
मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. असं असताना मुंबईसह ठाणे परिसरात दहीहंडीचा जल्लोष सर्वाधिक असतो. याठिकाणी वेगवेगळ्या राजकीय मंडळींनी दहीहंडीचं आयोजन केलं आहे.येथे लाखो रुपयांचे बक्षिस दहीहंडीला दिले जातात. अनेक गोविंदा पथक या ठिकाणच्या दहीहंडींना भेट देतात.आज मुंबईसह ठाण्यात पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. पावसामुळे गोविंदाचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे. सकाळपासून मुंबईतील गोविंदा पथक वेगवेगळ्या दहीहंडी फोडत आहे. दहीहंडी फोडताना 41 गोविंदा जखमी झाले आहे. या गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या मध्ये 8 गोविंदाना रुग्णालयात दाखल केलं आहे. 26 गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरु आहेत तर 7 गोविंदांना उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.