राजापूर मधील पुढच्या वर्षीची राजकीय हंडी भैय्या सामंत फोडतील असे काम करा:- उदय सामंत

राजापूर येथे शिवसेना राजापूर तालुका आयोजित दहीहंडी स्पर्धेच्या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी हजरी लावून गोविंदा पथकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. गेली दोन वर्ष या कार्यक्रमाला मला येण्याची संधी मिळते आणि तुम्हाला प्रोत्साहन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रथम शिवसेना राजापूर तालुक्याचे आभार मानले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राजापूर येथील स्पर्धेमध्ये हनुमान प्रसन्न खडपेवाडी या संघाने सहा थरांची सलामी लावल्याबद्दल त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले दही काळा खेळाचा दर्जा देण्याचे काम करणारे पहिले सरकार महायुतीचे सरकार आहे हे गोविंदा पथकांने लक्षात ठेवले पाहिजे.देशातील पहिली प्रो गोविंदा स्पर्धा मुंबईला घेण्याचे संधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या सारख्या कार्यकत्याला दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली खारीचा वाटा उचलत ही स्पर्धा यशस्वी केल्याचे मी भाग्य समजतो.एक लाख गोविंदांचे विमा उतरवण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले. राजापूरची दहीहंडी ही आदर्श दहीहंडी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी रायगड चे पालकमंत्री उदय सामंत यांनी राजापूरच्या या दहीहंडी कार्यक्रमानिमित्त केले.ते पुढे म्हणाले दोन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. जी व्यक्ती तुमच्या पारंपरिक, आरोग्य शैक्षणिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन देऊन भक्कमपणे उभे राहते अश्या भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत पुढच्या वर्षीची राजापूर मधील राजकीय हंडी फोडाल अशी अपेक्षा उदय सामंत यांनी राजापूर वासियांकडून व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावरती सिंधू रत्न समितीचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत, रत्नागिरीचे शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, उपजिल्हाप्रमुख अशपाक हाजु,राजू कुरूप,संजय ओगले, माजी नगराध्यक्ष जमीर खलपे,शहर प्रमुख सौरभ खडपे, संकेत खडपे, माजी नगराध्यक्ष हनीफ शेठ काजी, रत्नागिरीचे माजी नगरसेवक सोहेल मुकादम, रत्नागिरी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अल्ताफ संगमेश्वरी, यांच्यासहित अनेक गोविंदा पथक आणि स्पर्धक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button