मुसळधार पावसामुळे मार्लेश्‍वरमधील दत्तगुरू मठात अडकलेले भाविक सुखरूप

मार्लेश्‍वर देवस्थान येथील दत्तगुरू मठात भाविक अडकल्याचा मेसेज संगमेश्‍वर तालुक्यातील शासकीय यंत्रणेला मिळाला अन या भाविकांना वाचविण्यासाठी रविवारी मध्यरात्री पोलीस व आपत्कालीन यंत्रणा थेट मार्लेश्‍वर तीर्थक्षेत्री पोहोचली. या भाविकांकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने चर्चेला उत आला होता. सोमवारी सकाळी हे भाविक सुखरूप असल्याचा संदेश शासकीय यंत्रणेला मिळाल्याने सुटकेचा निश्‍वास टाकला. मात्र या घटनेमुळे शासकीय यंत्रणेची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.मार्लेश्‍वर देवस्थान नजिक नदीपलिकडे दत्तगुरूंचा मठ आहे. गगनगिरी महाराजांचे शिष्य पवनगिरी चव्हाण यांनी हा मठ उभारला असून ते ४० वर्षे वास्तव्याला देखील होते. वयोमानामुळे ते कोल्हापूर येथे वास्तव्याला असतात. मात्र या ठिकाणी श्रावण, दसरा, महाशिवरात्र, मकर संक्रांतीला येतात. गुरूवारी पवनगिरी चव्हाण महाराज व अन्य सात भाविक या मठामध्ये गेले होते. हा दत्तमठ नदीच्या पलिकडे आहे. पवनगिरी चव्हाण महाराज व भाविक ज्यावेळी मठात गेले त्यावेळी पाऊस नव्हता. यानंतर पावसाचे प्रमाण वाढल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे त्यांना नदीपार करून येणे शक्य झाले नाही.रविवारी रात्री चव्हाण महाराज यांचे पुणे येथील शिंदे नामक शिष्य यांनी कोकण आयुक्तांना संपर्क करून मार्लेश्‍वर येथील दत्तगुरू मठात गेलेल्या भाविकांशी संपर्क होत नसल्याचे सुचित केले. यानंतर मात्र सर्व शासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली. परंतु उशीर झाल्याने संपर्क होऊ शकला नाही मात्र दुसऱ्या दिवशी सकाळीच मठात गेलेल्या लोकांशी संपर्क झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button