पालकमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी समाजकल्याणच्या वसतिगृहाला दिली अचानक भेट वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी घेतले धारेवर वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यासमोर वाचला अडचणींचा पाढा
. *रत्नागिरी दि. २७ ऑगस्ट २०२४ राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी – रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौरावर असताना अचानक रत्नागिरी येथील समाज कल्याणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन वस्तीगृहाला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणींना बाबत माहिती घेतली. पालकमंत्री वस्तीगृहाला अचानक भेट दिल्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या जेवणाचे हाल पालकमंत्र्यांच्या नजरेत आले. विद्यार्थ्यांच्या जेवणाचे आखो देखे हाल पाहिल्यानंतर पालकमंत्र्यांचा पारा चढला आणि त्यांनी समाज कल्याणच्या वस्तीगृहाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. येथील विद्यार्थ्यांना असणारे निष्कृष्ट दर्जाचे जेवण पाहून पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगलेच सुनावले. रत्नागिरी समाज कल्याण वस्तीगृहामध्ये एकूण 85 विद्यार्थी राहत असून त्यांची जेवण,नाश्ता हे एका कंपनीला टेंडर देण्यात आले असून या कंपनीकडून निष्कृष्ट दर्जाचे जेवण या विद्यार्थ्यांना दिले जात आहे. शासनाच्या जीआर अनुसार ज्या पद्धतीने मेनू ठेवून दिला आहे त्या मेनू प्रमाणे कोणतेही जेवण विद्यार्थ्यांना दिले जात नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या लक्षात आले.त्यांनी जेवणा संदर्भात आणि इतर समस्या संदर्भात वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची चर्चा केली. यावेळेस विद्यार्थ्यांना शासनाकडून दिले जाणारे भत्ते, युनिफॉर्म आणि इतर सोयी सुविधांचा अभाव असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. संबंधित अधिकारी विद्यार्थ्यांना आवश्यक बाबी पुरवत नसल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. समाज कल्याणच्या वस्तीगृहाचा लेखाजोखा घेतल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील विद्यार्थ्यांची कमिटी तयार करून त्यांच्याशी संवाद साधणार असून विद्यार्थी जेव्हा सांगतील जेवण चांगलं होतं त्यावेळेस संबंधित ठेकेदाराला बिल अदा करण्यात यावे अशा सूचना समाज कल्याण अधिकारी संतोष चिकने यांना दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी समजून त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी पालकमंत्री म्हणून पुरवण्याच्या आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि शिवसेने तालुका प्रमुख बाबू म्हाप, रत्नागिरी एमआयडीसीचे आरओ वंदना खरमाळे, सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता अमोल ओठवणेकर, जनक थोत्रेकर,समाज कल्याण अधिकारी संतोष चिकणे आदी उपस्थित होते.