ट्रेनी नर्स अत्याचार प्रकरणी विविध अंगाने पोलीस तपास जारी , आरोपीचा शोध सुरू
रत्नागिरी शहरात कालचंपक मैदान येथे ट्रेनिंग नर्स वर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाला होता सदरची नर्स बेशुद्ध अवस्थेत चंपक मैदान येथे मिळाली होती त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या प्रकारामुळे संतप्त झालेल्या रत्नागिरीकरांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली होती विविध राजकीय पक्षाचे नेतेही त्या ठिकाणी आले होते आरोपीला ताबडतोब फाशी द्यावी अशी त्यांची मागणी होती संतप्त झालेल्या नागरिकांनी सुरुवातीला सहा वाजता व त्यानंतर साडेआठ वाजता रस्ता रोको केले याप्रकरणी पोलिसांनी संयमाची भूमिका घेत नागरिकांना तपास कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते त्यानंतर रात्र उशिरा आंदोलक परतले होते आता या प्रकरणात पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला असून हा तपास विविध अंगाने करण्यात येत आहेत आरोपीचा शोध घेण्याचे काम सर्व स्तरावर सुरू आहे सदरचे नर्स हे आरोग्य मंदिर जवळील एका रुग्णालयाच्या नर्सिंग कॉलेजमध्ये होती सदरच्या मुलीच्या जबानी प्रमाणे एका रिक्षाचालकाने आपल्याला प्यायला कडवट पाणी दिल्याने आपण बेशुद्ध पडलो असे सांगितले होते त्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत चंपक मैदान येथे सापडली होते मात्र सदरची नर्स रुग्णालयात जाण्याऐवजी चंपक मैदान येथे कशी गेली याबाबतही तपास सुरू आहे तपासात सदरची नर्स अनेक वेळा थेट देवरुख येथून रिक्षानेही येत असल्याचे कळत आहे त्यामुळे काल नेमके काय झाले याची माहिती पोलीस तपासात सुरू आहे तसेच या प्रकरणात एकच आरोपी आहे की आणखी आरोपी आहेत या दृष्टीनेही पोलीस तपास करीत असून लवकरच हा गुन्हा उघड होण्याची शक्यता आहे दरम्याने पोलीस तपासात सदरच्या मुलीची काही सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याचे कळत आहे त्याचा आधार घेऊन आता पोलीस तपास यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे