गुहागर तालुक्यातील अमोल अशोक नरवणकर आणि विशाल विश्वास साळुंखे यांनी हिमाचल प्रदेशमधील माऊंट युनाम शिखर सर केले

गुहागर तालुक्यातील अमोल अशोक नरवणकर आणि विशाल विश्वास साळुंखे यांनी हिमाचल प्रदेशमधील माऊंट युनाम हे ६ हजार १११ मीटर उंचीचे शिखर सर केले आहे.युनाम पर्वत सर केल्यानंतर तिरंगा फडकावून या दोघांनी मोहीम फत्ते केली. तालुक्यात या दोघांच्या कामगिरीची माहिती कळताच अनेकांनी अभिनंदन केले.पुण्यातील एव्हरेस्ट वीर भगवान चवले यांच्या नेतृत्वाखाली अमोल नरवणकर आणि विशाल साळुंखे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. यासाठी दोघांनाही सह्याद्री वेडा या ग्रुपने सहकार्य केले. हिमाचल प्रदेशातील मनाली लेह रोडवरील लाहौल स्पिती या परिसरातील भरतपूर बेसवरून ट्रेकिंगला सुरवात केली. आठ दिवसात तेथील वातावरणाशी जुळवून घेत मनाली, केलाँग, झिंग झिंग बार व मग भरतपूरवरून ६ हजार १११ मीटर उंचीचे माऊंट युनाम शिखर सर केलं. या वेळी वेगाने वाहणारे थंड वारे, कमी तापमानामुळे हाडे गोठवणारी थंडी, प्राणवायूची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे शिखर सर केले.अमोल नरवणकर याला पहिल्यापासूनच ट्रेकिंगची आवड आहे. सह्याद्री वेडा ग्रुपच्या माध्यमातून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेकवेळा साहसी ट्रेकिंग केले आहे. अशा धाडसी गिर्यारोहणात सातत्य ठेवण्याचा त्याचा विचार आहे. याबाबत विचारले असता गुहागरातील तरुणांनीही पुढे येऊन या क्षेत्राकडे करियर म्हणून पाहिले पाहिजे. हे शिखर सर केल्याने स्वतःतील विलक्षण सामर्थ्याच दर्शन झालं. अद्भूत, अद्वितीय असा अनुभव होता, असे अमोल याने सांगितले. हा एक कठीण ट्रेक असल्याने गिर्यारोहकांना येथे जाण्यापूर्वी शरीराच्या तंदुरुस्तीची खूप काळजी घ्यावी लागते. अशा या अत्यंत कठीण शिखर सर केल्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button