होमगार्ड भरतीत १ हजार ४८७ जणांनी दिली शारिरीक चाचणी

जिल्ह्यात होमगार्डची ५०६ रिक्त पदे आहेत. या पदांसाठी २,१०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये गुरूवारी १ हजार तर शुक्रवारी ४८७ उमेदवारांची कागदपत्र व शारिरीक चाचणी पार पडली. गुरूवारी पहिल्याच दिवशी या प्रक्रियेवेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक जयश्री गायकवाड व पोलीस उपअधीक्षक गृह राधिका फडके उपस्थित होत्या.जिल्ह्यात होमगार्डची ५०६ रिक्त पदांसाठी २,१०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ही रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली आहे. या भरतीमध्ये ४५० महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले. २२ ऑगस्ट रोजी सकाळी या भरती प्रक्रियेला पोलीस परेड मैदानावर सुरूवात झाली होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button