सुपारी समजून फोडला गावठी बॉम्ब, शेतकरी जखमी

शेतामध्ये गुरांसाठी चार कापण्यासाठी गेले असताना सुपारी समजून घरी आणलेली वस्तू गावठी बॉम्ब निघाली. सुपारी म्हणून फोडत असताना तिचा स्फोट होऊन संबंधित शेतकरी जखमी झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही घटना तालुक्यातील माणगाव खोर्‍यातील एका गावात घडली आहे.माणगाव खोर्‍यातील एक शेतकरी सकाळी आपल्या शेतात गुरांसाठी लागणारी चार कापण्यासाठी गेले होते. यावेळी चार कापत असताना त्यांना त्या ठिकाणी सुपारी सदृश्य एक वस्तू मिळाली. त्यांनी ती सुपारी आहे असे समजून घरी आणली. घरी आणल्यावर ती सुपारी फोडण्याच्या धारदार हत्याराने ती फोडत असताना अचानक त्याचा स्फोट झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तो शेतकरी व त्याच्या कुटुंबातील सर्वजण गोंधळून गेले. या शेतकर्‍याच्या हाताला दुखापत झाली असून वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत उपचार करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button