वाशिष्ठीत मांस अवशेषांपाठोपाठ मृत गाढवही
चिपळूण शहरातून वाहणार्या वाशिष्ठी नदीत प्लॅस्टिक कचर्यासह चिकन, मटणचे टाकावू अवशेष टाकले जात असल्याची ओरड सुरू असतानाच आता चक्क मृत गाढवही नदीपात्रात शुक्रवारी आढळून आल्याने तीव्र संताप व्यक्त होवू लागला आहे. अशा प्रकारामुळ आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून असे कृत्य करणारे सुधारणार कधी? असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे.नदी स्वच्छ ठेवा, त्यामध्ये घाण टाकू नये, कचरा टाकू नये असे आवाहन वारंवार प्रशासकीय यंत्रणांकडून करण्यात येत असले तरी काहीजण नदी म्हणजे हक्काची घाण टाकण्याची जागा असे समजू लागले असल्याने शहरात असे प्रकार वाढीस लागले आहेत. अलिकडेच शहरातून जाणार्या वाशिष्ठी आणि शिवनदीत प्लास्टिक कचरा बिनधास्त फेकला जात आहे. अगदी घरातील मृत व्यक्तीचे बेड, त्यांचे कपडे टाकण्याची हक्काची जागा म्हणून नदीकडे मोर्चा वळवला जात आहे. www.konkantoday.com